मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोली-खालापूर दरम्यान किलोमीटर ३६ जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर तीन वाहनांची भीषण धडक झाली. तीव्र उतारावर फेविकॉलसदृश केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने पिकअप व्हॅनला व कंटेनरला धडक दिली. अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. रस्त्यावर सांडलेले केमिकल हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी
Source: Prahaar