महाराष्ट्रात एसआयआर दावे-हरकतींची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली

महाराष्ट्रात एसआयआर दावे-हरकतींची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवली

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली असून, त्यांचा निपटारा १० नोव्हेंबरपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या मतदारांना आता निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची अट शिथिल करण्यात आली आहे; बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) त्यांच्या घरी भेट देऊन कागदपत्रे गोळा करतील व ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करतील. सुनावणी केवळ अपवादात्मक परिस्थितीत, शक्यतो ऑनलाइन घेतली जाईल. बेघर, मजूर व गरजू नागरिकांसाठी विशेष शिबिरे व मदत कक्ष सुरू करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies