भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांना राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळण्याचा सल्ला दिला. नगरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राजकीय भूमिकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात, मात्र व्यक्तिगत आयुष्याची मर्यादा जपली पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आपण प्रयत्न करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय टीकेला लक्ष्मणरेषा आवश्यक: विखे पाटील
Source: Deshdoot