राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा असून केंद्राकडूनही मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही – शिंदे
Source: Lokshahi Marathi