खराब हवामानामुळे चारधाम यात्रा शनिवार दुपारपासून रविवारपर्यंत दोन दिवस स्थगित करण्यात आली आहे. हवामान विभागाने २६ आणि २७ सप्टेंबरसाठी उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गढवालचे आयुक्त आनंद स्वरूप यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान अनुकूल झाल्यावरच यात्रा पुन्हा सुरू होईल.
चारधाम यात्रा दोन दिवस बंद; उत्तराखंडात रेड अलर्ट
Source: Prahaar