नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. जुन्या महाराष्ट्र सदनापासून नव्या सदनापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांच्या हस्ते आरती झाली, तर डॉ. श्वेता सिंघल यांनी सहभागींचे आभार मानले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची भव्य सांगता
Source: Prahaar