पावसाच्या ओढीमुळे राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर झाला. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील ४९ तालुक्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना जमीन महसूल सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीजबिल सवलत आणि परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. ५ ऑक्टोबरपासून जिओ-टॅग्ड फोटोंसह पंचनामे सुरू होतील.
महाराष्ट्रात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; नाशिक विभागातील ४९ तालुके समाविष्ट
Source: Prahaar