शहीद भगतसिंग हे केवळ सशस्त्र क्रांतिकारक नव्हते, तर विवेकनिष्ठ नास्तिक विचारवंतही होते. धार्मिक वातावरणात वाढलेल्या भगतसिंगांनी अभ्यास, चिंतन आणि सामाजिक वास्तवाच्या चिकित्सेतून नास्तिकतेचा स्वीकार केला. जगातील अन्याय, युद्ध आणि शोषण ईश्वर का थांबवत नाही, असा त्यांचा मूलभूत प्रश्न होता. कर्मसिद्धांताच्या आधारे जन्माधारित विषमतेचे समर्थन करण्याला त्यांनी आव्हान दिले.
भगतसिंगांचा नास्तिकवाद विवेक आणि सामाजिक न्यायाचा शोध
Source: Max Maharashtra