मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) कुरिअर नेटवर्कच्या माध्यमातून चालणाऱ्या मोठ्या सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि गुवाहाटी येथे एकाच वेळी कारवाई करत 10.36 कोटी रुपये किमतीचे 6.61 किलो सोने जप्त करण्यात आले. मुख्य सूत्रधारासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली असून, गेल्या नऊ महिन्यांत सुमारे 475 कोटी रुपयांच्या 318 किलो सोन्याची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे.
सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; 11 जणांना अटक
Source: Prahaar