नांदेडच्या कौठा भागात शुक्रवारी रात्री जुन्या कौटुंबिक वैमनस्यातून ३५ वर्षीय नरेश बालाजी पवार यांची धारदार खंजीरने भोसकून हत्या करण्यात आली. बसवेश्वरनगर येथील चक्कीजवळ पूर्वनियोजित कट रचून हल्ला झाला. नांदेड ग्रामीण पोलिसांनी काही तासांतच मुख्य आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
नांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खंजीरने खून
Source: Pudhari