अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. यामुळे २२०० कोटी थकबाकी असलेल्या जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बँकेला यंदा ६३ कोटींचा नफा झाला असून १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. सलग तिसऱ्या वर्षी वसुलीवर परिणाम होणार असल्याने आजच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकांच्या निर्णयांकडे लक्ष लागले आहे.
दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी वाढणार
Source: Deshdoot