अत्यल्प पावसामुळे सोयाबीननंतर आता कपाशीवरही संकट गडद झाले आहे. राज्यात कपाशीची लागवड सरासरीच्या ९० टक्के म्हणजे ३८ लाख ४० हजार हेक्टरवर झाली असून अकोला, वाशीममध्ये क्षेत्र वाढले आहे. गेल्या ५० दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला असून बोंडे फुटू लागल्याने दसऱ्यापूर्वीच वेचणी सुरू झाली आहे.
पावसाच्या खंडामुळे कपाशीवर संकट; वेचणी लवकर
Source: Agrowon