महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे-सातारा-कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Source: Jai Maharashtra News