भारतीय हवामान विभागानुसार 29 सप्टेंबर रोजी दक्षिण भारत, ईशान्येकडील राज्ये आणि बेटांवरील प्रदेशांत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीतील स्थितीमुळे 30 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, कोकण, तामिळनाडू, आसामसह सहा ईशान्य राज्यांना इशारा असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
29 सप्टेंबरला अनेक राज्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
Source: Jai Maharashtra News