अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून संगमनेर हे या निवडणुकीचे केंद्रस्थान ठरले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याचे वृत्त आहे. संगमनेर तालुक्यातील ७१५ मतदार दोन जागांसाठी निर्णायक ठरणार असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीचे केंद्रस्थान संगमनेर
Source: Deshdoot