सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज भरला. दुष्काळग्रस्त जत तालुक्याचे आमदार असलेल्या पडळकरांनी आलिशान गाड्यांचा ताफा, फटाक्यांची आतिषबाजी आणि रॅली केल्याने विरोधकांकडून जोरदार टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी उधळपट्टी टाळण्याच्या सूचना दिल्यानंतर हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.
दुष्काळात पडळकरांचा अर्ज भरताना डामडौल, टीकेची झोड
Source: Sarkarnama