भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचा इंडिया आघाडीत वापर कडीपत्त्यासारखा होत असून वापरा आणि फेकून द्या अशी त्यांची स्थिती असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी राहुल गांधींच्या नादी लागून काढला जाणारा मोर्चा गर्जना नसून गजकर्ण असल्याचा घणाघात त्यांनी केला.
इंडिया आघाडीत ठाकरे गटाचा वापर कडीपत्त्यासारखा: नवनाथ बन
Source: Prahaar