यंदाच्या जून ते सप्टेंबर मोसमी हंगामात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १९ टक्के कमी म्हणजेच ८०४.४ मिमी पाऊस झाला. तीव्र एल निनोचे सावट आणि असमान वितरणामुळे जून, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मोठी तूट राहिली. मराठवाड्यात सर्वाधिक ३९ टक्के, तर विदर्भात २७ टक्के तूट आहे. देशातही हा २००१ नंतरचा चौथा सर्वात कमी पावसाचा हंगाम ठरला.
एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसात १९ टक्के तूट
Source: Agrowon