महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून राज्यातील बहुतेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. १ ऑक्टोबर रोजी कोणत्याही जिल्ह्याला मोठा पावसाचा अलर्ट नाही, मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडे राहील. सप्टेंबरमध्ये अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने शेतीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हवामानाकडे लागले आहे.
महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनची सुरुवात, पावसाचा जोर ओसरला
Source: Prahaar