महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यांत कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा IMDचा दीर्घकालीन अंदाज आहे. २ ऑक्टोबरला कोणताही विशेष इशारा नसून कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक हलक्या सरी व मेघगर्जनेची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यास उकाडा वाढून कोकण व मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव जास्त जाणवू शकतो.
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा IMD अंदाज
Source: Jai Maharashtra News