सोन्यासाठी छळ, उपचारास नकार; गर्भवतीचा बाळासह मृत्यू

सोन्यासाठी छळ, उपचारास नकार; गर्भवतीचा बाळासह मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे नऊ महिन्यांच्या गर्भवती समीक्षा ऊर्फ स्वाती विशाल निंबाळकर हिचा बाळासह मृत्यू झाला. सोन्यासाठी छळ आणि प्रसूतीचा खर्च करण्यास सासरच्यांनी नकार दिल्याचा आरोप आहे. ६ सप्टेंबरला प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरांनी तातडीने सिझेरियनचा सल्ला दिला, पण उपचारास विलंब झाला. २५ सप्टेंबरला घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पाचोड पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies