ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात कुटुंबीयांनी एका तरुणीवर संशय व्यक्त केला आहे. हत्येच्या काही दिवस आधी ती दोन तरुणांसोबत आढळली होती आणि नंतर पूर्णेकर यांच्या कार्यालयाबाहेर दिसली, असा दावा मुलगा राम पूर्णेकर यांनी केला. पोलिसांनी विशेष पथक स्थापून तपास सुरू केला असून, एका माजी सहकाऱ्याला अटक केली आहे.
पूर्णेकर हत्या प्रकरण: तरुणीवर कुटुंबीयांचा संशय
Source: Sarkarnama