सोशल मीडियावर बनावट खात्यावरून अल्पवयीन मुलींना अश्लील संदेश, फोटो व व्हिडिओ पाठवणाऱ्या मंगेश तांबे याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. उत्तन येथील राहणारा तांबे याने २०१७-१८ मध्ये फेसबुकवर मुलीचे खोटे खाते तयार करून विनयभंग व मानसिक छळ केला होता.
बनावट खात्यावरून मुलींना अश्लील संदेश; आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी
Source: Prahaar