आष्टी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली. तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकून देशी-विदेशी दारू व जुगार साहित्यासह सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाच जणांवर जुगार तर चार आरोपींवर अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल झाले असून कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
आष्टीत अवैध दारू व जुगारावर पोलिसांची धडक कारवाई
Source: Pudhari