दुबई-तेल अवीव विमानात सह-वैमानिकाच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही 180 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या घाटकोपर येथील कुटुंबीयांची मुंबई महापौर रितू तावडे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्यांनी स्मित यांच्या प्रकृतीची विचारपूस करून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. मच्छार कुटुंबीयांचे निवासस्थान महापौरांच्या प्रभाग क्रमांक 132 मध्ये असून आमदार पराग शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कॅप्टन मच्छार कुटुंबीयांना महापौरांची सदिच्छा भेट
Source: Prahaar