पुण्यातील एमपीएससीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सुमारे पावणेतीन तास वेळ दिला; १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षा पद्धतीत सुधारणा करून पुन्हा आंदोलनाची वेळ येणार नाही, असे आश्वासन राणे यांनी दिले.
एमपीएससी आंदोलनस्थळी मंत्री नितेश राणे यांची भेट, सरकार पाठीशी असल्याचे आश्वासन
Source: Prahaar