नवी मुंबईत मंगळवारी 16 तास पाणीपुरवठा बंद

नवी मुंबईत मंगळवारी 16 तास पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते बुधवारी मध्यरात्री 2 या 16 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीच्या कामांमुळे हा बंद पडणार आहे. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच खारघर आणि कामोठे नोडवर याचा फटका बसणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies