पिंपरी अजमेरा कॉलनीतील डब्ल्यू सेक्टरमधील पीडब्ल्यूडी सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. इमारतींना वरवर रंगरंगोटी केली असली, तरी आत तुटलेले दरवाजे-खिडक्या, तुंबलेले ड्रेनेज चेंबर आणि सांडपाण्याचा प्रश्न कायम आहे. मोकळ्या जागांमध्ये गवत व कचरा साचला असून भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. झाडांची मुळे इमारतींच्या दिशेने वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी अजमेरा वसाहतीची दुरवस्था; बाहेर रंगरंगोटी, आत समस्या कायम
Source: Pudhari