वल्लभनगर आगारातील शिवभोजन केंद्राला टाळे, एफडीएचे पथक तपासणीविना परत

वल्लभनगर आगारातील शिवभोजन केंद्राला टाळे, एफडीएचे पथक तपासणीविना परत

पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगारातील शिवभोजन केंद्र व इतर गाळे भाडे थकल्याने एसटी प्रशासनाने चार दिवसांपूर्वी बंद केले. अन्न व औषध प्रशासनाचे पथक तपासणीसाठी आगारात दाखल झाले, मात्र गाळ्यांना टाळे असल्याने खाद्यपदार्थांची तपासणी किंवा नमुने घेता आले नाहीत. पथकाने आगार प्रशासनाकडून माहिती घेऊन परतावे लागले. राज्यभरातील एसटी आगारांतील कॅन्टीनची तपासणी सुरू आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies