लखनऊमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढल्याने ४० हजारांहून अधिक घरांत पाणी शिरले असून सुमारे १० हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. बिहारमध्ये गंडक नदीच्या पुरामुळे सहा जिल्ह्यांतील सुमारे ४६६ गावे बाधित असून ८ लाख लोक प्रभावित झाले आहेत; ९२,७३० जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पुराशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
लखनऊत ४० हजार घरांत पाणी, बिहारच्या ४६६ गावांत पूर
Source: Divya Marathi