मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची आढावा बैठक झाली. विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळावा यासाठी जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्याचे आदेश त्यांनी दिले. सध्या आठवीपर्यंत मिळणारा लाभ दहावीपर्यंत देण्याची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश झाले.
पोषण आहार योजनेत जिल्हास्तरावर निर्णयाचे अधिकार
Source: Prahaar