मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावात दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी पाहणी करून महापालिकेला तातडीने स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन आणि जलजीव संरक्षणाच्या सूचना दिल्या. पितृपक्षात मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांनी पाण्यात तेल, तूप, गोड पदार्थ टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने पिंडदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बाणगंगा तलावात माशांचा मृत्यू; लोढा यांची पाहणी, पर्यावरणपूरक पिंडदानाचे आवाहन
Source: Prahaar