मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा मार्गावर तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी ७ ते १८ ऑक्टोबर २०२६ या काळात कसारा येथे विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहील; काही लोकल शॉर्ट टर्मिनेट होतील तर काही रद्द होतील. मेल-एक्स्प्रेस सेवांवरही परिणाम होणार असून प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कसारा-आसनगाव मार्गावर १२ दिवसांचा विशेष ब्लॉक
Source: Prahaar