पोलिसांसाठी 'मुख्यमंत्री शौर्य पदक'; कोठडी मृत्यू धोरणालाही मंजुरी

पोलिसांसाठी 'मुख्यमंत्री शौर्य पदक'; कोठडी मृत्यू धोरणालाही मंजुरी

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत कर्तव्य बजावताना साहसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांसाठी 'मुख्यमंत्री शौर्य पदक' सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. या पदकासोबत ५० हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल; दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा होईल. मरणोत्तर पदकाचीही तरतूद आहे. तसेच पोलीस कोठडीतील मृत्यू आणि छळामुळे अपंगत्व आल्यास वारसदारांना नुकसानभरपाई देण्याच्या धोरणालाही मंजुरी मिळाली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies