मुंबईतील सायन येथील बेस्टच्या अणिक डेपोमध्ये सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० सीएनजी बसेस जळून खाक झाल्या, तर दोन बसेसचं नुकसान झालं. अग्निशमन दलाने सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. जीवितहानी झाली नाही; आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही.
सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० बेस्ट बसेस जळून खाक
Source: Asianet Marathi