राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून किमान १०% पाणीकपात लागू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात आतापर्यंत २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पाणीवापरावर याचा परिणाम होईल.
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून १०% पाणीकपात
Source: Lokshahi Marathi