मुंबईतील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १०० नवीन वसतीगृहे, महाज्योतीला १,००० कोटी रुपये आणि शंभर टक्के शिष्यवृत्ती यांसह विविध मागण्यांवर चर्चा झाली. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. बैठकीत वसतीगृहांसाठी जागा उपलब्ध करण्याचा आढावाही घेण्यात आला.
ओबीसी मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
Source: Prahaar