अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी दाखल ३६९ उमेदवारी अर्जांची मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या कार्यालयात छाननी झाली. अपूर्ण कागदपत्रे, सुचक-अनुमोदकांचे आधारकार्ड व ऑडिट अहवाल नसल्याच्या त्रुटी आढळल्या. दहा वर्षे संचालकपदाच्या मुद्द्यावर आक्षेप न आल्याने संबंधित अर्ज स्वीकारले गेले. आक्षेपांवरील अंतिम निर्णय बुधवारी जाहीर होणार आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत ३६९ अर्जांची छाननी, आज आक्षेपांवर निर्णय
Source: Deshdoot