महाराष्ट्रात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल सक्रिय झाले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आरोग्य, पोलीस व महसूल विभागांचा समन्वय वाढवून जिल्हास्तरीय यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय झाला. संघटित गुन्ह्यांत सहभागी आरोपींवर मोक्का लागू करण्याची शिफारस कृती दलाने केली असून, हिवाळी अधिवेशनापूर्वी विविध जिल्ह्यांत आढावा बैठका होणार आहेत.
अवैध गर्भलिंग निदानाविरोधात राज्य सरकार सक्रिय
Source: Prahaar