मुंबईत घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण आणि मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजना प्रभावी असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. महापौर रितू तावडे व आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह झालेल्या बैठकीत राडारोडा नियंत्रण प्रणालीवर २५५ आस्थापनांची नोंदणी व २०२८ पर्यंत सात मलजल प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित होण्याची माहिती देण्यात आली. नागरिकांनी कचरा विलग करून स्वच्छता राखावी, असे आवाहनही मंडे यांनी केले.
घनकचरा व मिठी नदी पुनरुज्जीवन कामाबाबत पर्यावरण मंत्री समाधानी
Source: Prahaar