कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या, तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. अध्यक्षपदाच्या बैठकीला महायुतीचे 12 संचालक गैरहजर राहिल्याने कोरम पूर्ण न झाल्याने निवड रखडली. दरम्यान, राज्य सरकारने चार शासननियुक्त सदस्यांची नेमणूक केल्याने रोहित पवार यांनी भाजपवर लोकशाहीच्या गळचेपीचा आरोप केला आहे.
गोकुळ निवडणुकीनंतर शासननियुक्त सदस्यांवरून राजकीय वाद
Source: Mumbai Tak