राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकला आणि चेस्ट इन्फेशनमुळे ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि विश्वजित कदम यांनी भेट देऊन विचारपूस केली; आज गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्याही भेटीची शक्यता आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी ६१ तासांनंतर चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याने साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
शरद पवार ब्रिच कँडीत दाखल; प्रकृती स्थिर
Source: Lokshahi Marathi