भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२६ रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा आढावा महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला. गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व विभागांना समन्वयाने जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश दिले.
महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिकेची तयारी; आयुक्त भिडे यांचे आढावा बैठकीत निर्देश
Source: Prahaar