मुंबईच्या राणीबागेत चार आशियाई सिंह आणण्यासाठी गुजरातमधील साकरबाग प्राणिसंग्रहालयाला टफ्टेड कॅपुचिन माकडांच्या तीन जोड्या देण्याचे ठरले आहे. मात्र राणीबागेत ही माकडे नसल्याने महापालिका वनतारा किंवा दक्षिण आफ्रिकेतून खरेदीचा विचार करत आहे. माकडे थेट साकरबागला पाठवली जातील. गेली १२ वर्षे सिंहविरहित असलेल्या राणीबागेत नवीन वर्षात सिंह येतील, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.
राणीबागेत सिंह आणण्यासाठी माकडांची अडचण
Source: Prahaar