ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि श्वसनाच्या संसर्गामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी छातीत कफ आणि खोकल्याचा त्रास झाल्याने त्यांना पुण्याच्या रूबी रुग्णालयात दाखल केले होते; तपासणीनंतर डिस्चार्ज मिळाल्यावर पुन्हा त्रास जाणवल्याने त्यांना मुंबईत दाखल करण्यात आले. छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट दिली.
शरद पवार मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर
Source: Lokshahi Marathi