बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण याचा मृतदेह इमामपूर शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. धाराशिव पोलीस भरतीत आपली नोकरी बोगस प्रमाणपत्राने हिरावून घेतल्यानंतर त्याने बोगस खेळाडू प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश केला होता. कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
बोगस खेळाडू रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा मृत्यू
Source: Mumbai Tak