अहिल्यानगरच्या केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आरणगाव येथील मानव सेवा प्रकल्पातील वंचितांसोबत दिवाळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी किराणा साहित्य, कपडे, अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देऊन गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांनी पुढे आपले वाढदिवसही वंचितांसोबत साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी वंचितांसोबत साजरी केली दिवाळी
Source: Prahaar