मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीने (JICA) पहिल्या टप्प्यासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या कर्जसहाय्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी नागरिकांना लाभ होणार असून 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीडला जायकाकडून 20 हजार कोटींचा प्रतिसाद
Source: Prahaar