दिवाळी आणि छट पूजेच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण या पाच स्थानकांवर ५ ते १५ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. पश्चिम आणि उत्तर रेल्वेनेही अशाच प्रकारचे निर्णय घेतले असून, फलाटावरील अनावश्यक गर्दी नियंत्रित करणे हा यामागील उद्देश आहे. ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्यांच्या नातेवाईकांना सवलत देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या ५ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
Source: Prahaar