राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 87 लाख 45 हजार 669 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 नोव्हेंबरपर्यंत 4 हजार 372 कोटी 83 लाख रुपयांची दिवाळी अग्रीम मदत जमा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची ग्वाही दिली होती. तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 4,372 कोटींची दिवाळी अग्रीम मदत
Source: Prahaar